जैन उद्योजकांची शिखर संस्था ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)’चा सातवा स्थापनादिन समारंभ येत्या २७ जानेवारीला वरळीस्थित नेहरू सेंटरच्या जेड गार्डन सभागृहात आयोजिण्यात आला आहे. ‘जितो’चे चेअरमन नरेंद्र बलदोटा, अध्यक्ष मोतीलाल ओसवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष शांतिलाल कवाड, मुंबई क्षेत्राचे अध्यक्ष संजय डांगी आणि सरचिटणीस धीरज कोठारी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात, आगामी काळात संघटनेच्या विकासाविषयी व्यूहरचना आखली जाईल. शिवाय या प्रसंगी उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यातून नवीन मानदंड स्थापित करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल, अशी माहिती जितो अॅपेक्सचे महासचिव राकेश मेहता यांनी दिली. अल्पावधीत सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपली ओळख स्थापित करणाऱ्या या संघटनेचा स्थापनादिन मुंबईप्रमाणे देशाच्या अन्य शहरातही समारंभपूर्वक साजरा केला जाईल.
‘जितो’चा सातवा स्थापनादिन समारंभ २७ ला मुंबईत
जैन उद्योजकांची शिखर संस्था ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)’चा सातवा स्थापनादिन समारंभ येत्या २७ जानेवारीला वरळीस्थित नेहरू सेंटरच्या जेड गार्डन सभागृहात आयोजिण्यात आला आहे. ‘जितो’चे चेअरमन नरेंद्र बलदोटा, अध्यक्ष मोतीलाल ओसवाल,
First published on: 22-01-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7th foundation day celebration of jito