ढासळलेला रुपया आणि परिणामी चिंताजनक बनलेले वित्तीय तुटीने देशापुढे उभे राहिलेले आर्थिक संकट या पाश्र्वभूमीवर मौल्यवान धातू सोन्यात गुंतवणुकीचा कस गेल्या काही महिन्यांत लक्षणीय उतरला आहे. पण याच स्वरूपाच्या गुंतवणुकीला सरावलेल्यांना तत्सम उमदा पर्याय हा हिऱ्यांतील गुंतवणुकीने उपलब्ध केला आहे.
अलीकडच्या काळात भारतात वार्षिक ६५ ते ७० टक्के दराने मौल्यवान खडय़ांच्या मागणीत वाढ होत आहे. ही हिरेखरेदी केवळ दागिन्यांमध्ये सजविण्यासाठीच नसून एक गुंतवणूक म्हणूनही हा पर्याय बनून पुढे येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे हिऱ्याच्या अस्सलता व कस मोजण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि किमतीबाबत ठोस मानदंड घेऊन पुढे आलेल्या डिव्हाइन सॉलिटेअर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता यांनी सांगितले. सोने-चांदी या अन्य मौल्यवान धातूंप्रमाणेच हिऱ्याच्या किमतीही मागणी-पुरवठय़ातील वाढती तफावत आणि चलन बाजारात रुपयाच्या मूल्याच्या चंचलतेतून वधारत आहेत, असे मेहता यांनी सांगितले. येत्या काळात आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील हिरे-खाणींतून लक्षणीयरीत्या घटलेला पुरवठा, तसेच कॅनडा व रशियातील नव्या खाणींपुढे असलेल्या अडचणी पाहता हिऱ्याच्या किमती कमालीच्या वाढतील, असा मेहता यांचा कयास आहे. देशभरात सर्वत्र समान किंमत रचना असलेला डिव्हाइन सॉलिटेअर हा देशातील हिऱ्याचा पहिलाच ब्रॅण्ड आहे. किमतीबाबत पारदर्शकता असावी या उद्देशानेच डिव्हाइन सॉलिटेअरकडून ‘सॉलिटेअर प्राइस इंडेक्स’ नामक किंमत निर्देशांक विकसित करण्यात आला असून, तो दर महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रसिद्ध केला जातो. या निर्देशांकाचा मागोवा घेतल्यास हिऱ्याच्या किमतीने या गेल्या काही महिन्यांत मासिक ०.५ टक्के ते १ टक्का परतावा दिला आहे. डिव्हाइन सॉलिटेअरकडून हिऱ्याच्या पुनर्खरेदीची हमी असल्याने चांगला परतावा देणारा हा गुंतवणुकीचा पर्याय निश्चितच ठरतो.

Story img Loader