बदलत्या जीवनशैलीत आरामदायी निवाऱ्याच्या मूलभूत गरजा असलेल्या हिटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग या बाजार वर्गवारीत मोडणाऱ्या यंत्र-उपकरणे व उत्पादनांचे देशातील सर्वात मोठय़ा ‘अ‍ॅक्रेक्स इंडिया २०१३’ प्रदर्शनासाठी यंदा देशा-विदेशातील ४५० हून अधिक प्रदर्शकांनी सहभाग केला आहे.
 ‘इंडियन सोसायटी ऑफ हिंटिंग, रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनीयर्स (आयशेअर)’ या संघटनेकडून आयोजित  प्रदर्शनाचे हे १४ वे वर्ष असून, ते गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात येत्या रविवापर्यंत सुरू राहील. ब्लू स्टार, कॅरियर, डॅनफॉस, एलजी, डायकिन, मित्सुबिशी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आघाडीच्या कंपन्यांद्वारे प्रायोजित विशेष दालनेही प्रदर्शनात आहेत. या तीन दिवसात २०,००० हून अधिक व्यापार-प्रतिनिधी, प्रेक्षक प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास ‘अ‍ॅक्रेक्स २०१३’चे अध्यक्ष अकबर भारमल यांनी व्यक्त केला. ‘हरित इमारती’ हा यंदाच्या प्रदर्शनाचा मध्यवर्ती आशय असून, वातावरणातील प्रतिकूल बदलांच्या आव्हानाला सामोरे जाताना शीत उपकरण निर्मात्यांनी साधलेला नाविन्यतेचा कस दाखविणारी उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा