आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पायाभूत सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्यानेच महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शासन आणि मे. कॉर्निग टेक्नॉलॉजिज इंडिया लि. यांच्यात चाकण येथे ऑप्टिकल फायबर ग्लास निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्बाबाबत सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह उद्योगमंत्री नारायण राणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, कंपनीचे उपाध्यक्ष स्टिफन मिलर, व्यवस्थापकीय संचालक रुस्तम देसाई आदी उपस्थित होते. कंपनीच्या वतीने ६०० कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.

Story img Loader