वाहतूक पायाभूत सेवा क्षेत्रात मार्गदर्शन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा हातभार लागण्यासाठी एअर इंडियाने आरआयटीईएस लिमिडेटबरोबर सहकार्य करार केला आहे. याबाबतच्या करारावर मंगळवारी उभय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. याचा लाभ एअर इंडियाला नागपूर (मिहान) येथील विमान देखभाल व दुरुस्ती केंद्राच्या विकासाकरिता होणार आहे.
एअर इंडिया अमेरिकेतील विमान तयार करणारी कंपनी बोइंगबरोबर हे केंद्र विकसित करत आहे. या भागातील बांधकाम, हवाई माल वाहतूक केंद्र आदींसाठी एअर इंडियाला या सहकार्याचा लाभ होईल. याबाबतचा आराखडा १५ एप्रिलपर्यंत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. या केंद्रासाठी १० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. आरआयटीईएस लिमिटेड ही पूर्वाश्रमीची रेल इंडिया टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सव्‍‌र्हिसेस सार्वजनिक कंपनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा