एअरसेलच्या मुंबईतील मोबाइलधारकांना अन्य एअरसेलधारकांशी मोफत बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा महिन्याभरासाठी वैध आहे. हा लाभ आणखी महिनाभरासाठी विस्तारावयाचा असल्यास १०० रुपयांच्या पुढील कोणत्याही रकमेचा रिचार्ज करावा लागेल.
प्रारंभी फक्त एकदाच ९९ रुपये शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल. याचबरोबर कंपनीने एसएमएस, एसटीडी, डेटा यासाठीचे लाभही नव्या एअरसेल ग्राहकांना देऊ केले आहेत. डेटा लाभ ३० दिवसांसाठी ५०० एमबीपर्यंत घेती येऊ शकेल. मुंबईतील दूरसंचार क्षेत्रात विस्तार करताना कंपनीने गेल्या तिमाहीत २१ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. कंपनीची थ्रीजी सेवा देशातील १३ परिमंडळात उपलब्ध आहे.

Story img Loader