इंधन दरात कपातीचा लाभ सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांवर सोमवारी दिसून आला. तोटय़ात असलेल्या स्पाईस जेट, जेट एअरवेज या कंपन्यांचे समभाग मूल्य व्यवहारात १० टक्क्य़ांपर्यंत उंचावले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने कमी होत असल्याने भारतीय हवाई कंपन्यांनी त्यांच्या इंधन दरांमध्येही कपात केली आहे. ऑगस्टपासून सातत्याने हे दर कमी करणाऱ्या या कंपन्यांनी सलग चौथ्या महिन्यात दरकपात केली आहे. हे दर यंदा ७.३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. नवी दिल्लीत हवाई इंधन दर प्रति किलो लिटरमागे ४९८७.७० रुपयांनी कमी होत ते ६२,५३७.९३ रुपये झाले आहेत.
देशातील हवाई इंधनाच्या किमती या जागतिक स्तरावर इतर देशांच्या तुलनेत तब्बल ६० टक्क्य़ांपर्यंत अधिक आहेत. इंधन दरांचा हिस्सा कंपन्यांच्या खर्चात सुमारे ४० टक्के हिस्सा राखतो. इंधन दरातील कपातीमुळे त्याचा लाभ आता विमान प्रवाशांच्या हवाई खर्चावर दिसून येईल का, हे पाहावे लागेल. तसे झाल्यास ऐन हिवाळ्याच्या मोसमात विमान प्रवाशांची बचतच होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा