अलीकडेच वरचढ बोली लावून २जी स्पेक्ट्रम लिलाव झाला असला तरी स्पर्धात्मकतेच्या दबावापायी मोबाइल सेवा प्रदात्या कंपन्या कॉलदरांमध्ये वाढ करणार नाहीत, अशी दूरसंचार विभागाने दोनच दिवसांपूर्वी ग्वाही दिली असताना, कॉलदरात वाढीची पहिली गोळी या क्षेत्रातील सर्वात मोठय़ा भारती एअरटेलनेच डागली आहे.
एअरटेलने सरसकट दरवाढ केली नसली तरी आपल्या मुंबई आणि दिल्लीतील प्रीपेड ग्राहकांचे संभाषण काहीसे महाग जरूर केले आहे. या ग्राहकांना कॉलदरांसाठी ३३ टक्के अधिक पैसे आता मोजावे लागतील. पण बाजार अग्रणी एअरटेलकडून सुरुवात झाल्याचे पाहून अन्य कंपन्यांकडून दरवाढीचे अनुकरण कधी आणि कसे होईल, हे आता पाहावे लागेल. प्रतिमिनिट दोन ते तीन पैशांची मोबाइल सेवा प्रदात्या कंपन्यांकडून दरवाढ केली जाईल, असा विश्लेषकांचा कयास आहे.
एअरटेलकडून दरवाढ कशी?
मुंबई: सर्वाधिक खपाचे मुंबईतील प्रीपेड व्हाऊचर ‘१०६ प्लॅन’अंतर्गत प्रतिमिनिट ४० पैसे कॉलदर पडेल. जे आधीच्या तुलनेत ३३ टक्क्य़ांनी म्हणजे १० पैशांनी महागले आहे.
दिल्ली: येथे वापरात असलेल्या ‘गोल्ड प्लॅन’च्या दरातही ३३ टक्के वाढ होऊन प्रतिसेकंदाला २ पैसे मोजावे लागतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा