डॉ. रेड्डीज् लेबोरेटरीज्चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. के. अंजी रेड्डी यांचे शुक्रवारी सायंकाळी हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी समयराज्यम, मुलगी अनुराधा, जावई जी. व्ही. प्रसाद आणि मुलगा के. सतिश रेड्डी असा परिवार आहे.
डॉ. रेड्डीज् लेबोरेटरीज ही औषधनिर्मिती कंपनी त्यांनी १९८४ मध्ये स्थापन केली. संशोधन व विकास विभागाची स्थापनाही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली होती. आजारी असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कंपनीतील वावर कमी झाला होता. औषधनिर्मिती समूहाची जबाबदारी मुलगा व जावईच हाताळत आहेत. जावई जी. व्ही. प्रसाद हे कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तर मुलगा के. सतिश रेड्डी हे कंपनीचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
डॉ. रेड्डीज् लॅबचे संस्थापक डॉ. अंजी रेड्डी यांचे निधन
डॉ. रेड्डीज् लेबोरेटरीज्चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. के. अंजी रेड्डी यांचे शुक्रवारी सायंकाळी हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी समयराज्यम, मुलगी अनुराधा, जावई जी. व्ही. प्रसाद आणि मुलगा के. सतिश रेड्डी असा परिवार आहे.
First published on: 16-03-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anji reddy promoter and chairman dr reddys lab passes away