Budget 2022 E-Passport : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२२ मध्ये ई-पासपोर्टसंबंधी मोठी घोषणा केली आहे. २०२२-२३ या वर्षात भारतामध्ये ई-पासपोर्ट जारी केली जातील असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यामुळे नागरिकांना परदेशी यात्रेमध्ये सुविधा मिळणार आहेत. हे अर्थसंकल्प सादर होण्याआधीच, सरकार ई-पासपोर्ट संबंधी घोषणा करू शकते याबाबत अनेक अंदाज लावले जात होते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले, या पासपोर्टमध्ये चिप बसवण्यात येणार असून हे तंत्रज्ञात २०२२-२३ साली जारी करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना परदेशी यात्रा करणे सोपे होणार आहे. ही चिप डेटाशी संबंधित सुरक्षा सुधारण्यासाठी वापरली जाईल. यापूर्वी, मंत्रालय नागरिकांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट आणण्यावर चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते.
रेशन कार्डधारकांना पेट्रोल मिळणार स्वस्त ! जाणून घ्या कोण उचलू शकतो लाभ
काय आहे ई-पासपोर्ट ?
ई-पासपोर्ट सामान्यतः आपल्या नियमित पासपोर्टची डिजिटल आवृत्ती असेल. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवली असेल जी डेटा सुरक्षिततेसाठी मदत करेल. या मायक्रोचिपमध्ये पासपोर्टधारकाचे नाव आणि जन्मतारखेसह इतर माहिती असेल. हा पासपोर्ट जारी करण्यात आल्यानंतर इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगेतून नागरिकांची सुटका होणार आहे. यामध्ये बसवण्यात आलेल्या चिपच्या मदतीने पासपोर्ट इमिग्रेशन काउंटरवर सहजपणे स्कॅन केला जाईल.