ठाणे जिल्ह्यातील भाईंदर (पूर्व) येथील नवी शाखा सुरू करत सहकारी क्षेत्रातील आघाडीच्या अपना बँकेने शाखांच्या रौप्य महोत्सवी आकडा पार केला आहे. बँकेच्या रितु होराझन, १०० फूट कनाकिया रोड, काशिमीरा क्रॉस रोड येथील या शाखेचे उद्घाटन केंद्रीय नियोजन आयोग आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. खासदार आनंद अडसूळ, राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अपना परिवाराचे प्रमुख सुरेश तावडे, अपना बाजारचे कार्याध्यक्ष अनिल गंगर, अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, उपाध्यक्ष सदानंद शानभाग, प्रमुख व्यवस्थापक प्रकाश कोंडुरकर उपस्थित होते.