येत्या आर्थिक वर्षांअखेपर्यंत म्हणजे मार्च २०१६ पर्यंत ५००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट अपना सहकारी बँकेकडून गाठले जाईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी व्यक्त केला. बँक अलीकडेच ‘बीएफएसआय’चा सर्वोत्तम सहकारी बँक पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे. सरलेल्या २०१५ सालातील पाच पुरस्कारांमध्ये, २०१६ सालातील या पहिल्या पुरस्काराची भर म्हणजे बँकेच्या प्रगतीतील सातत्याचे द्योतक असल्याचे चाळके म्हणाले. ६२ इतका शाखा विस्तार असलेल्या बँकेने ४७३० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षांत आणखी तीन शाखा तर आगामी वर्षांत बँकेचा विस्तार ८० शाखांपर्यंत होईल, असा चाळके यांनी मानस व्यक्त केला.

Story img Loader