मागील यूपीए सरकारच्या कारकिर्दीत देशावर बसलेला धोरणलकवा आणि कर दहशतवादाचा शिक्का पुसण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे असून विद्यमान सरकारची पावले त्याच दिशेने पडत असल्याचे मत केंद्रीय संरक्षण व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. जेटली यांनी यूपीए सरकारच्या कारकिर्दीत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा पाढाही यानिमित्ताने वाचून दाखविला.
‘इंडियन एक्स्प्रेस’तर्फे बुधवारी मुंबईत आयोजित ‘एक्स्प्रेस अड्डा’ या व्यासपीठावर अरुण जेटली यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सल्लागार संपादिका कूमी कपूर व राष्ट्रीय व्यवहार संपादक पी. वैद्यनाथन अय्यर यांनी प्रश्न उपस्थित करून त्यांना बोलते केले. गेटवेसमोरील हॉटेल ताज येथे आयोजित या चर्चात्मक कार्यक्रमास उद्योग, राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सलग दोन टप्प्यांतील यूपीएच्या कारकिर्दीत कोळसा, दूरसंचारसारखे घोटाळे गाजले, असे नमूद करून जेटली यांनी मागील सरकारद्वारे अनेक चुकीचे निर्णय राबविले गेल्याचा शेरा मारला. या सरकारमुळे गुंतवणुकीचे वातावरण गढूळ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्वबळावर आलेल्या सरकारमुळे आम्हाला अनेक गुंतवणूकपूरक निर्णय घेणे सुलभ होत असून अर्थव्यवस्थाही गतिमान होत आहे, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण होत आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
भारताची प्रतिमा स्वच्छ करण्याच्या कामातच विद्यमान सरकार सध्या गुंतून पडले असून देशवासीय, गुंतवणूकदार यांच्यामध्ये ‘अच्छे दिन’चा विश्वास व्यक्त करणे याला प्राधान्य दिले जात आहे, असे जेटली यांनी सांगितले. सरकारपुढील आव्हाने मोठी असून त्यातून चर्चा, उपाययोजनांच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येत आहे. सुधारती अर्थव्यवस्था, महागाईत नरमाई, अधिकाधिक गुंतवणूक यावर सरकार भर देत असल्याचेही ते म्हणाले.
कर दहशतवाद, धोरणलकव्याचा शिक्का पुसण्याचे मोठे आव्हान:अरुण जेटली
मागील यूपीए सरकारच्या कारकिर्दीत देशावर बसलेला धोरणलकवा आणि कर दहशतवादाचा शिक्का पुसण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे असून विद्यमान सरकारची पावले त्याच दिशेने पडत असल्याचे मत केंद्रीय संरक्षण व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-08-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley at express adda