फॉच्र्युन इंडियाच्या यादीत भारतीय उद्योग क्षेत्रातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. आयसीआयसीआयच्या चंदा कोचर व अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला आहे.
एचपीसीएलच्या अध्यक्षा निशी वासुदेव यांना चौथे, तर एझेडबी व पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक झिया मोदी व केपगेमिनी इंडियाच्या कार्यकारी प्रमुख अरूणा जयंती यांना पाचवे स्थान मिळाले आहे. पहिल्या पाचही महिलांनी गेल्यावेळचे स्थान कायम राखले आहे. जयंती या गेल्या वर्षी सातव्या क्रमांकावर होत्या. फॉच्र्युन इंडियाच्या २०१५ च्या प्रभावशाली उद्योजिकांच्या यादीत पोर्टिया व इरॉस इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती देशपांडे यांना प्रथमच स्थान मिळाले असून त्या अनुक्रमे ४३ व ५० क्रमांकावर आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची आर्थिक कामगिरी चांगली आहे. भट्टाचार्य यांच्या नेतृत्वामुळे त्यात आणखी भर पडली. त्यांनी कर्ज क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. यादीतील सर्व महिला या ४० ते ७१ वयोगटातील असून त्यात पहिल्या दहामध्ये अपोलो हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक प्रीथा रेड्डी व टॅफेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिका श्रीनिवासन व शेल इंडियाच्या अध्यक्षा यास्मिन हिल्टन व एनएसईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचा समावेश आहे. किरण मुजुमदार शॉ, रेणू सूद कर्नाड, शोभना भारतीय, अनिता डोंगरे, एकता कपूर, रितू कुमार यांचा समावेशही यादीत आहे.
फॉच्र्युन इंडियाच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य प्रथम
प्रभावशाली उद्योजिकांच्या यादीत अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.
First published on: 10-11-2015 at 03:11 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arundhati bhattacharya most powerful woman in indian business says fortune india