भारतीय वाहन बाजारपेठेवर नव्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या निस्सानचे अध्यक्ष कार्लोस घोस्न यांनी हिंदुजा समूहाबरोबर भागीदारी करत नव्या स्टाइल या बहुपयोगी वाहनाचे सादरीकरण केले. अवजड वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या अशोक लेलॅन्डचे प्रवासी वाहन क्षेत्रात पदार्पण झाले आहे. या प्रसंगी कंपनीचे प्रवर्तक आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष जी. पी. हिंदुजा हेही उपस्थित होते. अशोक लेलॅन्डच्या सध्याच्या दोस्त या छोटय़ा व्यापारी वाहनांचे तंत्रज्ञान सीएनजी तसेच डिझेल इंधनवर चालणाऱ्या ‘स्टाइल’साठी वापरात आले आहे. निस्सानच्या चेन्नई येथील प्रकल्पातून या सात ते आठ आसनी वाहनाची निर्मिती होणार आहे. निस्सानच्या सहकार्यामुळे दोस्तद्वारे अशोक लेलॅन्डने प्रथमच छोटय़ा आकारातील व्यापारी वाहननिर्मितीत प्रवेश केला होता.