आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी केंद्राने योजलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’च्या अंमलबजावणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये पुढाकार घेतला असून, योजनेच्या शुभारंभालाच या ठिकाणी ३.०४ लाख वंचितांचे खाते उघडून दणक्यात सुरुवात केली आहे. पुणे शहरात माहिती व प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबईत कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल, नागपूरमध्ये ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी आणि ठाण्यामध्ये खाद्य व ग्राहक व्यवहारमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बँकेने योजनेचे उद्घाटन केले आणि निवडक लाभार्थ्यांना खात्यांचे वाटपही केले. पुण्यातील कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत, कार्यकारी संचालक आर. आत्माराम व आर. के. गुप्ता हे उपस्थित होते. अन्यत्र बँकेच्या महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा