बँकांनी ग्राहकाभिमुखतेवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्जदारांना कर्ज मिळविणे विनासायास आणि गतिमान बनेल, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी येथे केले. तथापि कोणत्याही कर्ज प्रस्तावासंबंधी जोखीम मूल्यांकनाच्या मानकांशी तडजोड केली न जाता, उदारपणे निर्णयही बँकांकडून घेतला जाऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्योग व व्यापार क्षेत्राचे प्रतिनिधी, बडे करदाते आणि व्यावसायिकांशी अर्थमंत्री यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींसंबंधाने संवाद साधला. या बैठकीदरम्यान एका नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमाच्या संस्थापकाने कर्ज उपलब्धतेची प्रक्रिया त्रासमुक्त होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. त्यावर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या – स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खरा यांनी प्रत्युत्तरादाखल, स्टार्टअपची चिंता भागभांडवली आर्थिक पाठबळाच्या बाजूने अधिक असल्याचे नमूद केले आणि अशा उपक्रमांनी पुरेसे भागभांडवलाची तरतूद केल्यास त्यांना आवश्यक पतपुरवठा मिळवून देण्याची ग्वाही दिली. नंतर, त्यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या ‘क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट’चा देखील उल्लेख केला.

अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या समक्ष घडलेल्या या प्रसंगावर भाष्य करताना एकंदरीत प्रवृत्तीवर बोट ठेवले आणि उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींची कानउघाडणी करीत काही सूचनाही केल्या. प्रश्न विचारणारी व्यक्ती ही एक नावीन्यपूर्ण उपक्रम चालवणारी महिला आहे यावर जोर देत, त्या म्हणाल्या, ‘सुरुवातीला खरा यांनी अतिशय मोघम उत्तर दिले आणि नंतर मागून कुणीतरी सुचविल्यानंतर, त्यांनी ‘क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट’ या सरकारी साहाय्याच्या योजनेबद्दल बोलणे सुरू केले.’