करदात्यांना चालू आर्थिक वर्षांचा करभरणा विनासायास करता यावा यासाठी विद्यमान २०१३-१४ आर्थिक वर्षांच्या सांगतेला म्हणजे  मार्चअखेरचे तीनही दिवस बँकांचे व्यवहार पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
शनिवारी (२९ मार्च) अर्धवेळ चालणाऱ्या बँकांच्या शाखा पूर्ण वेळ तर ३० मार्च रविवारी सुट्टी आणि सोमवारी ३१ मार्चला ३१ मार्च आर्थिक वर्षसांगता असूनही सर्व बँकांच्या शाखा पूर्ण कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्याबाबत सांगण्यात आले ३१ मार्च या वित्तीय वर्षांचा शेवटचा दिवस म्हणून ग्राहक, खातेदारांसाठी बँका बंद असतात. यंदा तर त्या दिवशी गुढीपाडवाही आहे. करवसुलीच्या माध्यमातून महसूल संकलन पार पाडण्यासाठी बँका उपरोक्त दिवशी सुरू ठेवण्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षांनी काढले आहे.
कंपन्यांना भरावयाच्या अग्रीम कराची मुदतही यापूर्वी १५ मार्चवरून १८ मार्च करण्यात आली होती. यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात सरकारने अप्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट ४५,४८३ कोटी रुपयांनी कमी करत ते ५.१९ लाख कोटी रुपये केले आहे. यामध्ये १.७५ लाख कोटी रुपये सीमाशुल्क, १.७९ लाख कोटी रुपये उत्पादन शुल्क तर १.६५ लाख कोटी रुपये सेवा कराचा समावेश आहे.

Story img Loader