शेअर बाजारासाठी आजचा दिवस ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकत ६८९ अंकांची घसरण होऊन निर्देशांक ३५,७४२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही १९७ अंकांची घसरण होऊ निफ्टी १०,७५४ अंकांवर बंद झाला. बँक, ऑटो, एफएमसीजी, आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्राच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १.५ ते २ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. नाताळ आणि वर्ष अखेर असल्यामुळे अनेकजण सुट्टीवर जातात. त्यामुळे पुढचे काही दिवस शेअर बाजारातील व्यवहारात नेहमीसारखी तेजी दिसणार नाही असा अंदाज आहे.

अमेरिकेतील आर्थिक घडामोडींचा आशियाई शेअर बाजारावर दबाव आहे. अमेरिकन सरकारला शटडाऊनचा सामना करावा लागू शकतो. असे झाल्यास अमेरिकन सरकारचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले.

Story img Loader