स्वयंपाकाच्या वायूसाठी गेल्या पाच महिन्यांमध्ये देशभरात ५३ लाख नवे जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी चालू महिन्याच्या सुरुवातीपर्यंत यासाठीची प्रतिक्षा यादी ४ लाखांहून अधिक आहे. लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय तेल व वायू मंत्री वीराप्पा मोईली यांनीच ही माहिती शुक्रवारी दिली. यानुसार, ऑक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१२ दरम्यान ५२ लाख ९३ हजार ४८५ नव्या जोडण्या दिल्या गेल्या आहेत. तर १ मार्च २०१३ पर्यंत ही मागणी असणारे नवे ग्राहक ४ लाख ३१ हजार ८५६ अद्यापही प्रतिक्षित आहेत. पुढील महिन्यात या सर्वाना नव्या जोडण्या दिल्या जातील, अशी ग्वाहीही यानिमित्ताने देण्यात आली आहे. देशात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल व वायू विपणन कंपन्यांमार्फत तेल इंधनाबरोबच स्वयंपाकाच्या वायूचाही पुरवठा होतो. उपरोक्त गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक नव्या जोडण्या अर्थातच सर्वात मोठय़ा उत्तर प्रदेशात (७.४४ लाख) दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र याबाबत ५.३८ लाख नव्या जोडण्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१३ च्या सुरुवातीलाच देशातील घरांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. एकटय़ा नवी दिल्ली तसेच आसपासच्या परिसरात यंदाच्या जानेवारीमध्ये घरांची विक्री वार्षिक तुलनेत ४६ टक्क्यांनी उंचावली आहे. येथे या कालावधीत ८ हजार ८१२ घरे विकली गेली आहेत. गेल्या जानेवारीत नवी दिल्ली परिसरात (एनसीआर) ६ हजार ३२ घरे विकली गेली होती. ‘प्रॉपइक्विटी’ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुंबई महानगर विभागातील घरांची विक्री मात्र १४ टक्क्यांनी घसरली आहे. येथे यंदा जानेवारी २०१२ च्या ५,९८३ च्या तुलनेत ५,१३० घरांचीच विक्री झाली आहे. नव्या घरांची विक्रीही या मुंबई परिसरात ४८ टक्क्यांनी खालावली आहे. या सर्वेक्षणासाठी देशभरातील ४० शहरांमधील ८,२०० विकासकांच्या ४५ हजारांहून अधिक प्रकल्पांचा आधार घेण्यात आला. जमीन हस्तांतरणावरील चर्चा, माफक घरांची अनुपलब्धता यामुळे एकूणच यंदा घरविक्री रुंदावल्याचे ‘प्रॉपइक्विटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जसुजा यांनी म्हटले आहे. व्याजदर किमान पाऊण टक्क्याने कमी झाल्यास या क्षेत्राला उठाव मिळेल, असेही त्यांना वाटते.