आगामी २०१४ वर्षांच्या सुरुवातीपासूच जर्मन बनावटीच्या बीएमडब्ल्यूची विविध आलिशान प्रवासी वाहने तब्बल ७ ते १० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत. भारतातील कार बाजारपेठेतील गेल्या सहा महिन्यांतील ही मोठी किंमतवाढ आहे.
बीएमडब्ल्यू इंडियाने या आधी ऑगस्टमध्ये ५ टक्क्यांनी किमती वाढविल्या होत्या. तेव्हा डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाचे निमित्त होते. व्यवसाय वाढीचा दृष्टिकोन ठेवूनच नव्याने किंमतवाढीचा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. किंमतवाढीचा कित्ता अन्य कंपन्याही गिरविण्याची शक्यता आहे. बीएमडब्ल्यूच्या विविध कारसह मिनी या नाममुद्रेतील छोटेखानी कारची किंमतदेखील जानेवारीपासून वाढणार आहे. कंपनी सध्या सिरीज १,३,५,६,७ तसेच एसयूव्ही एक्स १, एक्स ३,एक्स ५ आणि स्पोर्ट प्रकारातील एम सिरीजमधील कार तयार करते. त्यांच्या किमती २०.९ लाख ते १.७८ कोटी रुपयांदरम्यान आहेत. तर लक्झरी कॉम्पॅक श्रेणीतील मिनी नावाअंतर्गत कंपनी २३.७ ते ३३.२ लाख रुपयांदरम्यान त्यांची विक्री करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा