वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझव्र्ह बँकेने कितीही र्निबध आणले तरी आयात कमी होणे अशक्य असल्याचा स्पष्ट प्रतिपादन ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’ या सराफ व्यवसायातील मुंबईस्थित जुन्या व प्रतिष्ठित संघटनेने केला आहे.
बँकांच्या सोने आयातीवर र्निबध आणले गेले, मात्र ६० ते ७० आयात करणाऱ्या खासगी निर्यातगृहांवर कोणतेही बंधन नसणे अशा या धोरणातील उणीवेकडे संघटनेने लक्ष वेधले.
अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी ग्राहकांनी सोने खरेदी किमान वर्षभरासाठी टाळावी, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी केलेल्या विधानावर, ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’चे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी तीव्र आक्षेप घेत, असोसिएशनच्या वतीने नाराजी व्यक्त करणारे निवेदनही अर्थमंत्र्यांना धाडले आहे. सोन्यावरील आयातशुल्कात ८ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचा निर्णय पथ्यावर पडल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी मे महिन्यातील व्यवहारातील पहिल्या १३ दिवसांमध्ये सोने आयात १३.५ कोटी डॉलरवरून ३.६ कोटी डॉलपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले.
तथापि ही घट तात्पुरत्या स्वरूपाची असून, डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेल्या रुपयाचा हा परिणाम असल्याचे कम्बोज यांनी सांगितले. प्रत्यक्षात चालू तिमाहीत २००-२२५ टन सोने आयातीची सरासरी पातळी पुन्हा गाठली जाईल, असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.
देशात आयात होणाऱ्या सोन्यापैकी ६०-७० टक्के आयात ही मोजक्या तारांकित निर्यातगृहांकडून होत असते, त्यांच्या आयातीवर कोणतेही र्निबध नसणे ही या धोरणातील मोठी उणीव आहे. त्यामुळे सोने आयातीबाबत सरकारला इच्छित परिणामही दिसणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा