ब्रिक्स बँकेचे पहिले कर्ज हे चिनी चलनात असेल, असे न्यू डेव्हलपमेंट बँक या ब्रिक्स देशांच्या बँकेचे अध्यक्ष के.व्ही.कामत यांनी म्हटले आहे. नॅशनल डेव्हलपमेंट बँकेचे भांडवल १०० अब्ज डॉलर्स आहे.
कामत यांनी सांगितले, की पहिले कर्ज चीनच्या युआन रेनमिन्बीमध्ये मंजूर केले जाईल. शांघाय येथे या बँकेचे उद्घाटन २१ जुलै रोजी झाले होते. ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे देश ब्रिक्सचे सदस्य आहेत. कामत यांनी बँकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच पंतप्रधान ली केक्वियांग यांची भेट घेतली. ब्रिक्स देशांसाठी आर्थिक सहकार्य हे पुढचे पाऊल आहे, विकसनशील देश व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना हे सहकार्य प्रगतीच्या दिशेने नेणारे आहे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेला पूरक आहे, असे चीनच्या पंतप्रधानांनी या वेळी सांगितले. या बँकेचे सुरुवातीचे भांडवल १०० अब्ज डॉलर्स असून सुरुवातीला प्रत्येक देश देय असलेले ५० अब्ज भांडवल समान वाटून घेणार आहे. कामत यांनी सांगितले, की विकसनशील देश आता स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील. निधीसाठी ते संघटित होत आहेत, त्यामुळे विकसनशील देश आता परिपक्व अवस्थेकडे वाटचाल करीत आहेत. अस्थिरता असलेल्या स्रोतांकडून कर्ज घेण्यापेक्षा आपलीच एक व्यवस्था निर्माण करण्याचा या मागे ब्रिक्स देशांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा