आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजार (बीएसई)ने मंगळवारी १० वर्षे दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांमधील व्यवहारासह नव्या व्याजदर वायदा सौदे आपल्या ट्रेडर सदस्यांसाठी खुले केले. एनएसई आणि एमसीएक्स-एसएक्स या अन्य दोन शेअर बाजारांवर अशा सौद्यांना गेल्या आठवडय़ातच सुरुवात झाली आहे. बीएसईवर सकाळी ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी औपचारिक घंटानाद करून या नवीन व्याजदर वायदे सौद्यांमधील (इंटरेस्ट रेट्स फ्युचर्स- आरआयएफ) व्यवहार सुरू केले. विद्यमान रचनेतील आयआरएफ म्हणजे बाजार नियंत्रक, बाजार घटक आणि संलग्न अर्थसंस्था यांनी एकत्र येऊन बाजारात अर्थपूर्ण उत्पादने कशी सादर करता येतील, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी बोलताना सिन्हा यांनी व्यक्त केली. आयआरएफ हा व्यापारी समुदायाची गरज ओळखून पुढे आलेला समर्पक पर्याय असून, येत्या काळात अनेक नवनवीन गुंतवणूक योजना आणून रोखे बाजारपेठेच्या आगामी विकासाकडे आपण उत्सुकतेने पाहत असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. जागतिक स्तरावर आयआरएफसारख्या व्याजदराशी संलग्न डेरिव्हेटिव्हज्ची बाजारपेठ खूपच मोठी असून, त्यावरील व्यवहार हे आजच्या घडीला सर्वाधिक म्हणजे शेअर बाजार आणि कमॉडिटी बाजारापेक्षा खूपच अधिक आहेत, असे बीएसईचे मुख्याधिकारी आशीषकुमार चौहान यांनी माहिती दिली. बीएसईच्या ट्रेडिंग सदस्यांसह, बँका, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि कॉर्पोरेट घराणी, गैरबँकिंग वित्तसंस्था, उच्चसंपदा असलेले गुंतवणूकदार यांना संपत्ती निर्माणाबरोबरच चलन बाजारातील वध-घटीपासून बचावाचे हे अत्यंत उपयुक्त साधन ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आठवडाभरात उलाढाल
९००० कोटींपल्याड!
आयआरएफ सौद्यांना २१ जानेवारीपासून एनएसईने सुरुवात केली आणि पहिल्या चार दिवसात ५,९९९ कोटी रुपयांची, तर त्याच्या एक दिवस आधी २० जानेवारीला सौदे सुरू करणाऱ्या एमसीएक्स-एसएक्सने सरलेल्या शुक्रवारपर्यंत ३,३३० कोटींच्या उलाढालीचा आकडा गाठला. दोन्ही बाजारांवर या दिवसांत अनुक्रमे २,७५,५६१ आणि १,६३,९४२ सौदे झाले.
आता शेअर बाजारात व्याजदर वायदा सौदे
आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजार (बीएसई)ने मंगळवारी १० वर्षे दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांमधील व्यवहारासह नव्या व्याजदर वायदा सौदे
First published on: 29-01-2014 at 05:50 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse launches trading in interest rate futures