भांडवली बाजाराचा तेजीसह विस्तारणारा प्रवास मंगळवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठणारा ठरला. सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे एकाच दिवसात ५०० हून अधिक अंशांची झेप घेत सेन्सेक्स २८,८०० नजीक पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,७०० हा स्तर प्रथमच अनुभवला.
व्यवहारात २८,८२९.२९ पर्यंत मजल मारणाऱ्या मुंबई निर्देशांकाने दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत ५२२.६६ अंश वाढ नोंदविली. तर सत्रात ८,७०७.९० पर्यंत पोहोचलेला निफ्टी दिवसअखेर १४४.९० अंश वाढीसह ८,६९५.६० वर राहिला. एकाच व्यवहारातील या अनोख्या प्रवासामुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही ८९ हजार कोटी रुपयांची भर पडली.
चीनमधील वाढते सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे, युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अपेक्षित अर्थसाहाय्य तर स्थानिक पातळीवर सरकारच्या भविष्यातील आर्थिक सुधारणा व रिझव्र्ह बँकेमार्फत व्याजदर कपातीचा आणखी एक फेरा असा सारा संयोग मंगळवारी जुळून आला. याचा परिणाम दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जवळपास दोन टक्क्यांच्या वाढीची कमाई केली.
गेल्या चार व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाची वाढ तब्बल १,४३८ अंश राहिली आहे. सेन्सेक्सने यापूर्वीचा विक्रम २८ नोव्हेंबर २०१४ रोजी २८,६९३.९९ असा नोंदविला आहे. निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च स्तर ४ डिसेंबर रोजी नोंदला गेला आहे.
१०० कोटी रुपयांच्या पुढे असणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती मंगळवारी एकाच सत्रात तब्बल ८९,३७६ कोटी रुपयांनी उंचावली. त्यामुळे ती आता एकूण १,०२,२९,७२९ कोटी रुपये झाली आहे. शेअर बाजारातील १,५५२ समभाग वधारले.
कंपन्यांच्या तिमाही निकालातही नफावाढीचे चित्र दिसत असल्याचे गुंतवणूकदारांच्या मंगळवारच्या खरेदीच्या अनुभवावरून दिसले. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य वाढले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे ०.४४ व ०.४१ टक्क्यांनी उंचावले.
निर्देशांकांचे नवे उच्चांकी शिखर
भांडवली बाजाराचा तेजीसह विस्तारणारा प्रवास मंगळवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठणारा ठरला. सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे एकाच दिवसात ५०० हून अधिक अंशांची झेप घेत सेन्सेक्स २८,८०० नजीक
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2015 at 12:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse markets end at record closing highs and nifty tops