सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी संमिश्र व्यवहार नोंदले गेले. केवळ १.३० अंश घसरणीने सेन्सेक्स २८,४४२.७१ वर बंद झाला; तर १२.९५ अंश वधारणेने निफ्टी अवघ्या ८,५३७.६५ पर्यंतच पोहोचू शकला.
सेन्सेक्सने व्यवहारात २८,५०० पुढचा प्रवास केला; मात्र अखेर तो या टप्प्यापासून दुरावला. सत्रात तर त्याचा
मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र मंगळवारप्रमाणेच तेजीत राहिले. दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे तुलनेत अधिक १.३९ व १.६४ टक्के वाढ झाली. वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, तेल व वायू, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभाग वधारले; तर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार समभागांना कमी मागणी राहिली. घसरत्या डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान निर्देशांक मंगळवारीही नकारात्मक वाटचाल करत होता. सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य उंचावले; तर वाहन निर्देशांक वधारणेत आघाडीवर होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा