‘न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे’ असे संतवचन आहे. याचा अर्थ चुकून का होईना निखाऱ्यावर पाय पडला तरी त्या चुकीला क्षमा नाही, पायाला चटका लागणारच, भाजणारच! त्याचप्रमाणे मला हा नियम माहीत नव्हता, अमुक एक कार्यप्रणाली मला माहीत नव्हती असे शेअर बाजारातील व्यवहाराबाबत म्हटले तर ते क्षम्य नाही. त्या अनुषंगाने होणाऱ्या नुकसानीला सामोरे जायची तयारी ठेवायलाच हवी. अर्थात अशी माहिती देणे हाच तर या साप्ताहिक सदराचा हेतू आहे. मात्र अजून प्रचंड प्रमाणावर हे आíथक साक्षरताप्रसाराचे काम बाकी आहे याची खात्री पटते ती विविध ठिकाणी होणाऱ्या व्याख्यानांदरम्यान येणाऱ्या अनुभवांतून. ‘श..शेअर बाजाराचा’ या कार्यक्रमात जे प्रश्न विचारले जातात ते याला पुष्टी देतात. गेल्या महिन्यात एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये व्याख्यान होते. एमबीए अभ्यासक्रमात शेअर बाजार हा विषय शिकवला जातोच. त्याबाबत अधिक तपशीलवार आणि अद्ययावत माहिती देणे हा माझा प्रयत्न असतो. कारण अनेक वेळा पुस्तकात जे काही लिहिलेले असते त्याची वास्तवाशी सांगड घालू म्हटले तर जमत नाही. त्यामुळेच की काय, कित्येक लहानसहान बाबी विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्रत्यक्ष प्राध्यापकांनाही ठाऊक नसतात, हे ते प्रांजळपणे कबूल करतात. उपरोक्त कॉलेजमध्ये व्याख्यान सुरू होण्याच्या आधी एक प्राध्यापिका मला विचारतात की, ‘kCDSLl ‘ हे तुमचे पद (designation) आहे ना? मी म्हटले की, उऊरछ ही डिपॉझिटरी आहे आणि तिथे काम करीत असताना माझे पद आहे ते ‘हेड-इन्व्हेस्टर एज्युकेशन’ असे!! वस्तुत: स्टॉक मार्केट हा विषय शिकविणाऱ्या व्यक्तीला बीएसई, एनएसई, सीडीएसएल, एनएसडीएल ही नावे आणि त्यांचे कार्य माहिती नको का? आता या प्राध्यापिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल या कल्पनेने मी स्तब्ध झालो.
शेअर बाजाराचे काम सुरू होऊन ते साडेतीन वाजता संपेपर्यंत एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा भाव कमी-जास्त होत असतोच. समजा, सकाळी ३५ रुपये भाव असेल, मध्ये ३८, ४१, ४४, २९ वगरे होता होता बाजार बंद होतेवेळी ३३ रुपये झालेला असू शकतो. अर्थात मी जेव्हा ब्रोकरला शेअर खरेदी करायची सूचना दिली त्या वेळेला जो काही भाव असेल त्याप्रमाणेच मी ब्रोकरला पसे देणार. मला मिळालेल्या काँट्रक्ट नोटमध्ये तोच भाव लिहिलेला असणार.
एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांने प्रश्न विचारला की, मी जो काही चेक ब्रोकरला देणार तो बंद भावानुसार देणार ना? असे म्हणणे चुकीचे आहे. वरील उदाहरणात बंद भाव जरी ३३ रुपये असेल आणि मी सूचना दिली तेव्हा भाव ४१ होता तर मी प्रति शेअर ४१ रुपये या भावानेच चेक दिला पाहिजे. मात्र पूर्वी म्हणजे संगणकीकरण होण्यापूर्वीच्या काळात घेण्याचा भाव वेगळा आणि विकण्याचा भाव वेगळा अशी पद्धत होती. अर्थात याला फेरभाव असे गोंडस नावे होते!!
हा फेरभाव म्हणजे वरील दोन किमतीतील तफावत ही कित्येक वेळा १० रुपये इतकीही असे. संगणकीकरण झाल्यानंतर हा प्रकार बंद झाला. त्यामुळे आता जो शेअर मी ४२ रुपये ६० पसे या भावाने घेतला तो समोरील गुंतवणूकदाराने त्याच भावाने विकलेला असेल हे उघड आहे.
वरील उदाहरणे सांगण्यातील हेतू कुणाची कुचाळकी करणे हा नसून याबाबत किती कमी माहिती लोकांना आहे हे सांगण्याचा आहे. अनेक पुस्तके म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेली पाच पुस्तके वाचून त्याआधारे आपण सहावे पुस्तक स्वत: लिहावे असे घडते. एका पुस्तकात लिहिले होते की, आयपीओमध्ये आपल्याला शेअर्स वितरित झाले नाही तर भरलेले पसे डिमॅट खात्यात जमा होतात! चूक आहे हे. डिमॅट खात्यात नव्हे तर बँकेतील बचत खात्यात पसे जमा होतात. उकफछव्यतिरिक्त आणखी कोणत्या रिपॉझिटरीज भारतात आहेत, असे सुहास सामंत यांनी विचारले आहे NSDL Database Management Ltd, SHCIL Projects Ltd, Karvy Insurance Repository Ltd, CAMS Repository Services Ltd अशा अन्य चार रिपॉझिटरीज् सध्या आहेत.
एखादी व्यक्ती रिपॉझिटरी म्हणून कार्य करू शकते का, असेही ते विचारतात. केवळ कंपनी कायदा १९५६ अन्वये स्थापन झालेली संस्था पात्र आहे, व्यक्ती नाही. रिपॉझिटरी स्वत: विमा पॉलिसी वितरित करू शकत नाही. ते काम विमा कंपनीचे आहे. माझ्याकडे विमा पॉलिसी नसेल तरीही मी ई-इन्श्युरन्स-eIA खाते उघडू शकतो. जसे की माझ्याकडे शेअर्स नसतील तरीदेखील मी डिमॅट खाते उघडू शकतो तसेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा