सलग तिसऱ्या सत्रात समभागांची जोरदार विक्री करताना गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारी १९ हजाराच्याही खाली आणून ठेवले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवी दिल्लीत गुरुवारी सकाळी अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी पावले उचलण्याची दिलेली ग्वाही दिवसअखेरही भांडवली बाजाराला तारू शकली नाही. २१३.९७ अंश आपटीसह मुंबई निर्देशांक १८,८२७.१६ पर्यंत येऊन थांबला. ६१.१० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५७००ची पातळी सोडत ५६९९.१० वर स्थिरावला.
परकी चलन व्यवहारात रुपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत ५८ पर्यंत उंचावणारा रुपया गुरुवारी पुन्हा काहीसा नरमला.६० पैशांनी भक्कम होत ५७.७९ च्या वर गेला होता. निर्यातदारांकडून डॉलर मोकळे झाल्याने तो गुरुवारी सावरला खरा, पण तरीही १९ पैशांनी घसरत पुन्हा प्रति डॉलर ५७.९८ च्या तळात गेला.
अर्थमंत्र्यांच्या ग्वाहीचा शेअर बाजारावर परिणाम नाही; रुपयाही नरमच!
सलग तिसऱ्या सत्रात समभागांची जोरदार विक्री करताना गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारी १९ हजाराच्याही खाली आणून ठेवले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवी दिल्लीत गुरुवारी सकाळी अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी पावले उचलण्याची दिलेली ग्वाही दिवसअखेरही भांडवली बाजाराला तारू शकली नाही.
First published on: 14-06-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex falls 214 pts slips under 19k mark as apollo tyres sun pharma shares tank