सलग तिसऱ्या सत्रात समभागांची जोरदार विक्री करताना गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारी १९ हजाराच्याही खाली आणून ठेवले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवी दिल्लीत गुरुवारी सकाळी अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी पावले उचलण्याची दिलेली ग्वाही दिवसअखेरही भांडवली बाजाराला तारू शकली नाही. २१३.९७ अंश आपटीसह मुंबई निर्देशांक १८,८२७.१६ पर्यंत येऊन थांबला. ६१.१० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५७००ची पातळी सोडत ५६९९.१० वर स्थिरावला.
परकी चलन व्यवहारात रुपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत ५८ पर्यंत उंचावणारा रुपया गुरुवारी पुन्हा काहीसा नरमला.६० पैशांनी भक्कम होत ५७.७९ च्या वर गेला होता. निर्यातदारांकडून डॉलर मोकळे झाल्याने तो गुरुवारी सावरला खरा, पण तरीही १९ पैशांनी घसरत पुन्हा प्रति डॉलर ५७.९८ च्या तळात गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा