मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी डुबकी शुक्रवारी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी एका दिवसात ७६९.४१ अंशांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीही २३४.४५ अंशांनी पडला. 
सेन्सेक्स कोसळण्याचा सर्वात मोठा फटका एचडीएफसी बॅंकेसह इतर महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअर्संना बसला. या कंपन्याच्या शेअर्सचे भाव खाली आले. एचडीएफसी बॅंकेच्या शेअर्सचे भाव ४.९ टक्क्यांनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे ३.८ टक्क्यांनी खाली आले. सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ३.८७ टक्क्यांनी तर निफ्टीमध्ये ४.०८ टक्क्यांनी घट झाली. यापूर्वी २२ सप्टेंबर २०११ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्देशांकात घट झाली होती.

Story img Loader