नव्या सप्ताहाची सुरुवात घसरणीने करणारा मुंबई शेअर बाजार सोमवारी दीड महिन्यांच्या तळात विसावला. महागाईचा दर नरम होऊनही घसरत्या रुपयाबद्दल चिंता व्यक्त करीत गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी विक्री अवलंबिली. सत्रात तब्बल २४५ अंशांपर्यंत आपटल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ३१.१२ अंशाने घसरत २७,३१९.५६ पर्यंत घसरला. तर व्यवहारात ८,२०० चा स्तर सोडणारा निफ्टी दिवसअखेर ४.५० अंश घसरणीने ८,२१९.६० वर थांबला.
परकी चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६२.५० च्याही खाली प्रवास करताना थेट ६३ नजीक जाण्याचा प्रयत्न केला. चलनाचा हा गेल्या ११ महिन्यांतील नीचांक होता. तर याचदरम्यान नोव्हेंबरमधील घाऊक किंमत
गेल्या आठवडय़ात सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्समध्ये ४८०.४२ अंशांची उतार नोंदला गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा