नव्या आवडय़ाची सुरुवात २० हजारांच्या वर करू पाहणाऱ्या मुंबई निर्देशांकालाही वाढत्या महागाईच्या चिंतेने या टप्प्यापासून खाली आणले. दिवसभरात ३५० हून अधिक अंशांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर किरकोळ वाढीसह २० हजारांपासून माघारी फिरला; तर अस्थिरतेच्या वातावरणातच निफ्टीत नाममात्र घट नोंदली गेली.
गेल्या सप्ताहाची अखेर सेन्सेक्सने १९,९७७.३८ अशी २० हजारांच्या काठावर केली होती. सोमवारच्या व्यवहाराची सुरुवातही दमदार राहिली. शुक्रवारच्या तुलनेत २४५ अंशांची दमदार वाढ नोंदवीत बाजार या वेळी २० हजारांच्या काठावर होता. लगेचच त्याने हा टप्पाही पार केला. तो २०,०७५ पर्यंत उंचावला. आधीच्या बंदच्या तुलनेत ही वाढ तब्बल ३५० अंशांहून अधिक होती. सरकारी रोख्यांमध्ये विदेशी कंपन्यांच्या गुंतवणूक मर्यादा शिथिल केल्याचा हा परिपाक होता. दुपारनंतर मात्र ऑगस्टमधील घाऊक किंमतवाढीचे आकडे जाहीर झाले आणि आठवडाअखेरच्या रिझव्र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरणात व्याजदर कपात नाही या भीतीखातर गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. अखेर अवघ्या ९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स १९,७४२.४७ वर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजारात मात्र १०.०५ अंश घसरणीसह ५,८४०.५५ वर स्थिरावला. बँक निर्देशांकाच्या आगेकूचसह सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक वधारले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा