अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर ‘कोलगेट’ प्रकरणाची काळी छाया असताना, लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने वित्तीय संकट टाळण्यासाठी सरकारला दिलेले सहकार्याचे आश्वासन मंगळवारी बाजाराच्या पथ्यावर पडले. अन्यथा या घालमेलीत दिवसभर निर्देशांकाचे वध-घटीचे हिंदोळे सुरू होते. परंतु दिवसाची अखेर सेन्सेक्सने कालच्या तुलनेत ११६ अंशाच्या कमाईने, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २६.१ अंशांच्या कमाईने केली. सेन्सेक्स १९५०४.१८ वर तर निफ्टी ५९३०.२० अंशावर दिवसअखेर स्थिरावला.
सकाळी बाजार उघडताच, हिंदुस्थान युनिलीव्हर तब्बल १० टक्के वर उघडून दिवसभरात १७ टक्क्यांपर्यंत वर उंचावला. समभागाने दिवसात ५९७ रुपये हा गेल्या वर्षभरातील उच्चांक स्तर गाठला आणि दिवसअखेर ५८३.६० रुपयांवर विश्राम घेतला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचे ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकही तब्बल ४.६५ टक्क्यांनी उंचावताना दिसला. बरोबरीने धातू (०.९६ टक्के), आरोग्य निगा (०.८५ टक्के), माहिती-तंत्रज्ञान (०.४१ टक्के) हे निर्देशांक वर होते. आघाडीच्या समभागांमध्ये हिंदुस्तान युनिलीव्हर, आयटीसी, स्टरलाइट, डॉ. रेड्डी, आयसीआयसीआय बँक यांनी मुसंडी मारली. तर खाली जाणाऱ्यांमध्ये हिंडाल्को, एचडीएफसी बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचडीएफसी व ओएनजीसी यांचा समावेश होता.
अखेरच्या तासाभराच्या सत्रात कालच्या तुलनेत खाली घसरण झालेल्या बाजाराला युरोपीय बाजाराला सकारात्मक संकेतांनी वर ढकलण्यास हातभार लावला. जागतिक बँकेने भारताच्या आगामी आर्थिक विकासदराबाबतचा अंदाज आधीच्या सात टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांवर खालावल्याच्या बातमीचे बाजारात निराशाजनक पडसाद उमटले. मात्र अर्थमंत्री चिदम्बरम यांनी बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ‘टॅक्स रेसिडेन्सी सर्टिफिकेट’बाबत मळभ दूर करणारे निवेदन अर्थ विधेयकाला मंजुरी देताना केले. विदेशातील सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रालाच ग्राह्य़ धरण्याची चिदम्बरम यांनी केलेली स्पष्टता बाजाराला सुखावणारी ठरली. त्यातच युरोपियन बँकेच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत पाव टक्क्यांची कपात अपेक्षित असल्यामुळे युरोपातील बाजारांनी तेजीने केलेला प्रारंभही आपल्या बाजारासाठी उपकारक ठरला.
वध-घटीच्या हिंदोळ्यांनंतर, ‘सेन्सेक्स’ची ११६ अंशांची कमाई
अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर ‘कोलगेट’ प्रकरणाची काळी छाया असताना, लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने वित्तीय संकट टाळण्यासाठी सरकारला दिलेले सहकार्याचे आश्वासन मंगळवारी बाजाराच्या पथ्यावर पडले. अन्यथा या घालमेलीत दिवसभर निर्देशांकाचे वध-घटीचे हिंदोळे सुरू होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits 6 wk high rises 116 pts led by hindustan unilever shares