सोने-हव्यासाला आळा घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाणिज्य बँकांवर लागू केलेले र्निबध रिझव्र्ह बँकेने सहकारी बँकांनीही लागू केले आहेत. आता सहकारी बँकांना ग्राहकांना सोने-तारण कर्ज देताना काही बंधने पाळावी लागतील.
आपल्या कोणत्याही ग्राहकाला खास घडविलेल्या आणि बँकांकडून विकल्या गेलेल्या सुवर्ण नाण्यांवर कोणत्याही राज्य अथवा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांना ५० ग्रॅम (पाच तोळे) वजनापेक्षा अधिक सुवर्ण नाणी तारण ठेवून कर्ज देऊ नये, असे रिझव्र्ह बँकेने ताज्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात ग्राहकांना कर्ज दिले जाऊ नये, असे रिझव्र्ह बँकेचे फर्मान आहे. या आधी रिझव्र्ह बँकेने बँकांच्या सोने आयातीवर मर्यादा घातल्या आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती ओसरल्याने सरलेल्या एप्रिल महिन्यात, मासिक सरासरी ७० टनाची सोने आयात ही जवळपास दुपटीने वाढून १५२ टनांवर गेल्याचे आढळून आले. बहुमोल विदेशी चलन खर्ची घालून होणाऱ्या या आयातीने भारतीय चलन अर्थात रुपयाच्या मूल्यावरही विपरीत परिणाम होत असून, आयात-निर्यात व्यापाराचे संतुलन आणखीच बिघडण्याबरोबरच चालू खात्यातील तुटीलाही ते खतपाणी घालत आहे. परिणामी, देशांतर्गत सोने आयात महागडी बनवून तिच्यावर आवर घालण्याच्या उद्देशाने, सरकारने दोनच दिवसांपूर्वी सोन्यावरील आयात शुल्क हे ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर नेणारा निर्णय घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा