परकी चलन व्यवहारातील मोठी हालचाल बुधवारी थांबली असली तरी भांडवली बाजार अद्याप घसरणीतून सावरलेला नाही. प्रमुख निर्देशांकातील आपटी दुसऱ्या दिवशीही कायम राखताना सेन्सेक्सने शतकी घट नोंदविली. असे करताना तो १९ हजाराच्या काठावर येऊन ठेपला. तर कालच्या व्यवहारात ५,८०० ची पातळी सोडणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बुधवारी २८.६० अंश नुकसानासह ५,७६०.२० वर थांबला.
एप्रिलमधील औद्योगिक उत्पादनात झालेली घसरण आणि अपेक्षेपेक्षा अधिक राहिलेला मेमधील महागाई दर यामुळे व्याजदर कपातीची आशा सोडलेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार समभाग विक्री केली. फिचने देशाचे पतमानांकन वाढविल्याचेही त्यांनी फारसे मनावर घेतले नाही.
रिझव्र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण येत्या सोमवारी जाहिर होणार असून बुधवारी स्पष्ट झालेल्या अर्थस्थितीविषयक आकडय़ाने तमाम उद्योग क्षेत्राची व्याजदर कपातीची आशा कायम आहे.
भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सेबीने बुधवारी प्रोत्साहनपर पावले उचलली. मात्र याबाबतचा निर्णय भांडवली बाजारातील व्यवहाराखेर जाहिर झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांना नोंदविता आला नाही. तसेच फिच या पतमानांकन संस्थेने भारताचे उंचावलेले मानांकनही गुंतवणूकदारांना फारसा उत्साह देऊ शकले नाही. पतमानांकन उंचावण्याबाबत स्टॅन्डर्ड अॅन्ड पूअर्सकडून तमाम अर्थव्यवस्थेला अधिक अपेक्षा आहे.
सेन्सेक्स अद्यापही दोन महिन्याच्या तळातच आहे. १८ एप्रिल रोजी मुंबई निर्देशांक आजच्या समकक्ष होता. बाजारात आज माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा क्षेत्रीय निर्देशांकांनी नुकसान सोसले.
याउलट औषधनिर्माण आणि तेल व वायू निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे भाव उंचावले. सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांचे मूल्य खालावले.
५८ पर्यंत उंचावणारा डॉलर मागे फिरल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री होऊ लागली. इन्फोसिस, टीसीएससारख्या कंपन्यांचे मूल्य २ टक्क्यांपर्यंत खालावले.
महागाई दर शिथिल झाल्याने बँक समभागही कमकुवत बनले. मेमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक १० टक्क्यांच्या आत विसावला असला तरी शुक्रवारी जाहिर होणाऱ्या याच कालावधीतील घाऊक किंमत निर्देशांकावर बाजाराची नजर असेल. शिवाय मध्यवर्ती बँकेच्या येत्या सोमवारच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यावरही बाजारातील गुंतवणूकदारांच्या व्यवहारांची मदार असेल.
सेन्सेक्सची आपटी कायम
परकी चलन व्यवहारातील मोठी हालचाल बुधवारी थांबली असली तरी भांडवली बाजार अद्याप घसरणीतून सावरलेला नाही. प्रमुख निर्देशांकातील आपटी दुसऱ्या दिवशीही कायम राखताना सेन्सेक्सने शतकी घट नोंदविली. असे करताना तो १९ हजाराच्या काठावर येऊन ठेपला. तर कालच्या व्यवहारात ५,८०० ची पातळी सोडणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बुधवारी २८.६० अंश नुकसानासह ५,७६०.२० वर थांबला.
First published on: 13-06-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits new 2 month low down 102 pts on weak iip numbers