गेल्या आठवडय़ातील निराशा पूर्ण क्षमतेचे झटकून टाकत भांडवली बाजार नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच त्याच्या अनोख्या टप्प्यावर पुन्हा आरुढ झाला. जागतिक शेअर बाजारातील तेजीबरोबरच स्थानिक पातळीवर रिलायन्ससारख्या समभागाने साथ दिल्याने सेन्सेक्स एकाच दिवसात तब्बल ३२६ अंशांची झेप घेत २० हजार पल्याड गेला. तर निफ्टीनेही शतकी उडी घेत राष्ट्रीय शेअर बाजाराला त्याच्या ६ हजाराच्या वरच्या टप्प्यावर पुन्हा आणून ठेवले.
गेल्या संपूर्ण आठवडय़ात शेवटचा दिवस वगळता बाजाराने नकारात्मक कामगिरी नोंदविली होती. शुक्रवारी त्याने किरकोळ वाढ नोंदविली असली तरी सेन्सेक्स २० हजार तर निफ्टी ६ हजारापासून लांबवरच होते.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच प्रमुख भांडवली बाजार तेजीसह वाटचाल करू लागले. रिलायन्स कंपनीचा समभाग थेट ५.१२ टक्क्यांनी वधारला. ८२८.२५ रुपयांसह तो गेल्या आठ महिन्याच्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचला.
गुंतवणूकदारांनी सन फार्मा, (+४.६६%), कोल इंडिया, भेल, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, हीरो मोटोकॉर्प, जिंदाल स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, विप्रो या आघाडीच्या समभागांचीही खरेदी केल्याने सेन्सेक्स चांगलाच वधारला.प्रमुख निर्देशांकातील २७ कंपन्यांचे समभाग उंचावले होते.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक ३ टक्क्यांसह उंचावला होता.
तेजी उसळली..
गेल्या आठवडय़ातील निराशा पूर्ण क्षमतेचे झटकून टाकत भांडवली बाजार नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच त्याच्या अनोख्या टप्प्यावर पुन्हा आरुढ झाला. जागतिक शेअर बाजारातील तेजीबरोबरच स्थानिक पातळीवर रिलायन्ससारख्या समभागाने साथ दिल्याने सेन्सेक्स एकाच दिवसात तब्बल ३२६ अंशांची झेप घेत २० हजार पल्याड गेला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-05-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex jumps 326 pts to regain 20000 pt mark as ril shares jump over