महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा कळस गाठला. सत्रातील गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवत सेन्सेक्स गुरुवारी २४,२००च्या स्तराला येऊन ठेपला. घसरणीमुळे निफ्टीनेही ७३००ची पातळी सोडली.
३२१.९४ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक २४,२३४.१५ पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ९४ अंश घसरण नोंदवत ७२३५.६५ वर स्थिरावणे पसंत केले. दोन्ही निर्देशांकातील आपटी ही सव्वा टक्क्यापेक्षा अधिक ठरली.
बुधवारी सेन्सेक्स किरकोळ ८ अंशांनी वधारला होता. गुरुवार हा मे महिन्यातील वायदा पूर्तीचा अखेरचा दिवस होता. सत्राची सुरुवातच मुंबई निर्देशांकाच्या २४,५३४.१३ या किमान पातळीवरून झाली. दिवसभर हे चित्र कायम राहिले. व्यवहारात सेन्सेक्स २४,२०६.५० पर्यंतच्या तळापर्यंत आला.
व्यवहारात ३२१.९४ अंशाने आपटताना सेन्सेक्सने गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घट नोंदविली. यापूर्वी २७ जानेवारीच्या सत्रात निर्देशांक तब्बल ४२६.११ अंशांनी घसरला होता. तर त्याचा गुरुवारचा बंद हा २१ मे रोजीच्या २४,२९८.०२ नंतरचा किमान स्तर राहिला.
सेन्सेक्समधील २२ समभाग घसरले. यामध्ये रिलायन्स १.४२ टक्के घसरणीत पुढे राहिला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, एल अ‍ॅण्ड टी, ओएनजीसी, टाटा मोटर्स, भेल, भारती एअरटेल हेही घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा वगळता सर्व घसरले.
ल्ल  आयटी ढेपाळले!
मुंबई शेअर बाजाराच्या दफ्तरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी गुरुवारचा दिवस खराब राहिला. संस्थापक नारायण मूर्ती यांच्या परत येण्याने कंपनीचा दहाव्या मोठय़ा अधिकाऱ्याच्या गळतीच्या ठरल्याच्या वृत्तानंतर इन्फोसिसचा समभागही तब्बल ७.८१ टक्क्यांनी घसरला. इन्फोसिसच्या समभागाचे मूल्य गुरुवारी पुन्हा सप्टेंबर २०१३च्या स्तराला म्हणजे ३००० रुपयांखाली आले. बंगळुरातच मुख्यालय असलेला विप्रोही २.६३ टक्क्यांनी घसरला. तर एचसीएल टेकही २.३५ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान क्रमांक एकची आयटी कंपनी टीसीएस मात्र घसरणीला अपवाद ठरली.
इन्फोसिस     ” २९२४.३० ७.८१%
ओरॅकल फिनसव्‍‌र्ह    ” २८४६.६० २.८४%
विप्रो    ” ५००.२०    २.६३%
एचसीएल टेक    ” १४०३.३० २.३५%
हेक्झावेअर टेक    ” १४२.२५  १.९०%
टेक महिंद्रा     ” १८७६.२५ ०.४९%

Story img Loader