अर्थसंकल्प सादर होण्याच्या पहिल्या क्षणापासूनच दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्सचा आकडा कधी वर, तर कधी खाली असा हिंदकाळत होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्सची ‘वाऱ्यावरची वरात’ आनंदाने पुढे निघून गेली.
भांडवली बाजारात शनिवारी व्यवहार होत नाहीत; मात्र केंद्रीय अर्थसंकल्प असल्याने या दिवशी आवर्जून व्यवहार खुले ठेवण्यात आले होते. सकाळच्या सत्रातच आर्थिक राजधानीत पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्याचबरोबर भांडवली बाजारातही व्यवहारांचे मळभ होते. सुरुवातीच्या स्थिर व्यवहारानंतर अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजीचा वेग नोंदला गेला. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील भाषणादरम्यान मात्र बाजाराने अस्वस्थता निर्माण केली.
अर्थसंकल्प दिनी १४१.३८ अंश वाढीसह सेन्सेक्सने गेल्या चार अर्थसंकल्प दरम्यानची पहिली वाढ नोंदविली. मात्र व्यवहारात त्याने ७०० पर्यंत आपटी नोंदविली. ‘गार’ची तूर्त बाजूला सरलेली तलवार, प्रत्यक्ष कर संहितेचा सुटलेला प्रश्न व वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा मुहूर्त यामुळे बाजार काहीसा सावरला. मात्र
श्रीमंतावरील संपत्ती कर रद्द करणे, कंपन्यांवरील कर टप्प्याटप्प्याने पाच टक्क्यांनी कमी करणे याचे बाजारातील गुंतवणूकदारांनी स्वागत केले. बँक, आरोग्यनिगा, वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये मागणी नोंदली गेली. तर सेवा कराच्या वाढत्या जाळ्यापोटी ग्राहकोपयोगी वस्तू समभाग बाजाराच्या तेजीअखेरच्या वातावरणातही नरम राहिले.
लघु व मध्यम उद्योगाच्या वित्तपुरवठय़ासाठी नवी बँक, सरकारी कंपन्यांचे निर्गुतवणूक प्रक्रिया, पायाभूत सेवा क्षेत्राला उत्तेजन, बचत व गुंतवणुकीला प्राधान्य अशा अर्थसंकल्पातील घोषणांनी बाजारात उत्साह संचारला व संबंधित क्षेत्रातील समभागांमध्येही अनुरूप प्रतिसादही नोंदला गेला.
यापूर्वी तीन वेळा सादर झालेल्या अर्थसंकल्प दिनी भांडवली बाजाराने निराशा नोंदविली आहे. यंदाही व्यवहारात तसेच काहीसे चित्र होते, मात्र दिवसअखेर ते पुसले गेले.
अरे ज्या वयात हाती कर घ्यायचे,
त्या वयात कसल्या करसवलतीच्या चर्चा करता?
– काकाजी
दलाल स्ट्रीटवर ‘वाऱ्यावरची वरात’
अर्थसंकल्प सादर होण्याच्या पहिल्या क्षणापासूनच दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्सचा आकडा कधी वर, तर कधी खाली असा हिंदकाळत होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-03-2015 at 02:25 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nse nifty gain after fm arun jaitleys budget 2015 focuses on growth investment