गुरुवारच्या गोंधळानंतर भांडवली बाजारांनी सप्ताहअखेर सर्वोच्च स्तर पुन्हा एकदा गाठला. मात्र मोठी निर्देशांक वाढ राखूनही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ हजाराला गाठू शकला नाही.
महिन्यातील पहिल्या आठवडय़ाची अखेर करताना मुंबई शेअर बाजार सकाळच्या व्यवहारात २५,८४४.८० या वरच्या टप्प्यावर सुरू झाला. सत्रात तो २५,९८१.५१ पयज्ञंत पोहोचलाही. मात्र केवळ १३८.३१ अंश वधाणेमुळे तो २६ हजारांच्या आत २५,९६२.०६ वर थांबला. बुधवारीच बाजाराने २५,८४१.२० हा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. तर व्यवहारात गुरुवारी तो २५,९९९ पर्यंत तो गेला.
शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६.८० अंश वधारणेसह ७,७५१.६० या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला. दोनच दिवसांपूर्वी ७,७२५.१५ अशी सर्वोच्च मजल मारणारा निफ्टी शुक्रवारी व्यवहारात ७,७५८ पर्यंत झेपावला.
१३० पैकी सेन्सेक्समधील रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेनेच १०० अंश वधारणीचा हिस्सा राखला. निर्देशांकातील १९ समभाग उंचावले.