भांडवली बाजारातील तेजी मंगळवारी पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवली. एकाच सत्रात सेन्सेक्स जवळपास ३०० अंशांनी झेपावल्याने तो १९ हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबई निर्देशांकात २८२.८६ अंश वाढ झाल्याने प्रमुख निर्देशांक १९,२२९.८४ पर्यंत गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ८६.९० अंश वाढ झाल्याने हा निर्देशांक ५,६९९.३० वर पोहोचला आहे. वाढती वित्तीय तूट तसेच रुपयातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांना भांडवली बाजारांनी मंगळवारी प्रतिसाद दिला.
गेल्या काही सत्रांपासून भांडवली बाजाराची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. शेअर बाजाराचा कालचा प्रवासही नव्या सप्ताहाची सुरुवात करताना नकारात्मक व्यवहाराने झाला होता. आयात-निर्यात व महागाई वगळता औद्योगिक उत्पादन दराच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीने चिंताग्रस्त वातावरणात भर टाकली होती. त्यामुळे भांडवली बाजाराच्या प्रवासाबाबत शंका होती.
‘सेन्सेक्स’ पुन्हा १९ हजारापुढे
भांडवली बाजारातील तेजी मंगळवारी पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवली. एकाच सत्रात सेन्सेक्स जवळपास ३०० अंशांनी झेपावल्याने तो १९ हजाराच्या पुढे गेला आहे.
First published on: 14-08-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex opens 51 points up with reality it and power sector leading the rise