भांडवली बाजारातील तेजी मंगळवारी पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवली. एकाच सत्रात सेन्सेक्स जवळपास ३०० अंशांनी झेपावल्याने तो १९ हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबई निर्देशांकात २८२.८६ अंश वाढ झाल्याने प्रमुख निर्देशांक १९,२२९.८४ पर्यंत  गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ८६.९० अंश वाढ झाल्याने हा निर्देशांक ५,६९९.३० वर पोहोचला आहे. वाढती वित्तीय तूट तसेच रुपयातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांना भांडवली बाजारांनी मंगळवारी प्रतिसाद दिला.
गेल्या काही सत्रांपासून भांडवली बाजाराची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. शेअर बाजाराचा कालचा प्रवासही नव्या सप्ताहाची सुरुवात करताना नकारात्मक व्यवहाराने झाला होता. आयात-निर्यात व महागाई वगळता औद्योगिक उत्पादन दराच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीने चिंताग्रस्त वातावरणात भर टाकली होती. त्यामुळे भांडवली बाजाराच्या प्रवासाबाबत शंका होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा