लक्षणीय टप्प्यावरील तेजी आठवडय़ाच्या सलग दुसऱ्या दिवशीही कायम राखताना प्रमुख निर्देशांक मंगळवारी त्याच्या आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचले. रिलायन्सच्या जोडीने कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, आयटीसीसारख्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीत रस दाखविल्याने सेन्सेक्स २०,१५० तर निफ्टी ६,१००च्या वर गेले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३०.०५ अंश वाढीसह २०,१६०.८२ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.१० अंश वधारणेमुळे ६,१११.२५ पर्यंत गेला. अध्र्या टक्क्यांहून अधिकच्या निर्देशांक वाढीने दोन्ही बाजार आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
सेन्सेक्सने नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सोमवारी थेट ३२६ अंशांची झेप घेतली होती. तत्पूर्वी शुक्रवारी बाजाराने किरकोळ वाढ नोंदविली होती. मात्र २० हजारांचा टप्पा त्याला सोमवारीच गाठता आला. परंतु दोन्ही दिवसांतील वाढीने बाजारात ३५६ अंश भर पडली.
नवा वायुसाठा सापडल्यामुळे रिलायन्सचा समभाग कालच्या ५ टक्के वाढीनंतर मंगळवारी पुन्हा २ टक्क्यांनी वधारला. तर घसघशीत फायद्याच्या (+३५%) तिमाही नफ्याच्या निष्कर्षांने सार्वजनिक कोल इंडियाचा समभागही ३ टक्क्यांनी उंचावला. महिन्यातील वाहनविक्रीचे आकडे प्रतीक्षेत असतानाच सत्रात हीरो मोटोकॉर्पच्या समभागाची हालचाल लक्षणीय ठरली. कंपनीचे समभाग मूल्य थेट ५ टक्क्यांनी वाढले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा