सेन्सेक्सला २० हजारांवर घेऊन जाणारी भांडवली बाजारातील गेल्या तीन दिवसांतील तेजी मंगळवारी थांबली. रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य बँकांसाठीचे निधी उचलणे महाग केल्याचा परिणाम मुंबई निर्देशांकासह बँक समभागही तब्बल १० टक्क्यांनी आपटले. १८३.२५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २० हजारांच्या खाली १९,८५१.२३ वर तर निफ्टी
चलनात स्थिरता येण्याच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी सायंकाळी उशिरा उचललेल्या उपाययोजना गुंतवणूकदारांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्या. मध्यवर्ती बँकेमार्फत व्याजदर महाग केल्यामुळे अन्य व्यापारी बँकांना अतिरिक्त १२,००० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम भांडवली बाजारात सकाळच्या व्यवहारापासूनच भोगावा लागला. १९,७८८.०९ वर खुल्या झालेल्या मुंबई शेअर बाजाराने दिवसभरात १९,६४९.५८ पर्यंतचा तळ गाठला. दिवसअखेर तो १९,८९०.६३ पर्यंत सावरला असला त तरी कालच्या तुलनेत त्यात जवळपास २०० अंशांची घट नोंदली गेली.
गेल्या तीनही सत्रातील तेजीमुळे सेन्सेक्स ७४०.३६ अंशांनी उंचावला होता. असे करताना तो गेल्या दीड महिन्यात प्रथमच २० हजारांवर गेला होता. दरम्यान, ज्या स्थानिक चलनाच्या स्थिरतेसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पाऊल उचलले तो रुपया मंगळवारी डॉलरच्या तुलनेत ५८ पैशांनी भक्कम होत ५९.३१ पर्यंत गेला. रिझव्‍‌र्ह बँकेचा अन्य बँकांसाठीचा वाढीव व्याजदर बुधवारपासून अमलात येत आहे. बांधकाम निर्देशांक क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरणीच्या बाबतीत आघाडीवर होता. तर बँक क्षेत्रातील आघाडीच्या समभागांमध्येही १० टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकांची आपटी; स्टेट बँकेचा वार्षिक नीचांकाला स्पर्श!
सोमवारच्या निर्णयानंतर रिझव्‍‌र्ह बँकेकडून निधी उचलणे महाग ठरणार असल्याने भांडवली बाजारात बँक क्षेत्राशी निगडित समभाग चांगलेच आपटले. बीएसई सेन्सेक्समध्ये जरी ०.९१ टक्क्यांची घसरण झाली असली तरी बँकिंग समभागांचा निर्देशांक तब्बल सहा टक्क्यांच्या घरात घसरला. येस बँकेचा समभाग ९.९ टक्क्यांनी तर इंडसइंड बँकेने ७.९ टक्क्यांनी आपटी घेतली. व्याजदराशी निगडित बांधकाम क्षेत्रालाही मंगळवारी सेन्सेक्सबरोबरच घसरणीचा सामना करावा लागला.