यंदा अपेक्षेप्रमाणे नसली तरी आगामी कालावधीत रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या संकेताचे सूर पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सोमवारी सेन्सेक्सला त्याच्या आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले. तथापि बाजाराला वेध आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हच्या मंगळवारच्या नियोजित बैठकीचे लागले आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेला उभारीचे डोस देणारे ‘क्यूई ३’ धोरणाबाबत बाजाराला सकारात्मक आशा लागल्या आहेत. या धोरणाचा फेरविचार झाल्यास मात्र त्याचे बाजारात विपरीत पडसाद उमटू शकतात.
गेल्या आठवडय़ाची अखेर तेजीने करणाऱ्या भांडवली बाजाराची सप्ताहाची सुरुवात सकाळच्या सत्रातही सकारात्मक राहिली. रिझव्र्ह बँकेच्या ‘जैसे थे’ जाहीर झालेल्या पतधोरणाने बाजारावर काहीसा ताण निर्माण केला. किंबहुना धोरण जाहीर झाले तेव्हा ११ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्सने दिवसातील नीचांक १९,०८४ दाखविला. पण ही नरमाई अल्पकाळासाठीच राहिली आणि त्यापुढे मात्र निर्देशांक आश्चर्यकारकरित्या सावरला. सोमवारच्या उत्तरार्धातील सत्रातील या तेजीने सेन्सेक्सने १४७.९४ अंशांची कमाई केली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४१.६५ अंश वाढीसह ५,८५०.०५ पर्यंत गेला.
माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू निर्देशांकासह व्याजदराशी निगडित बँक आदी समभागांची बाजारात खरेदी झाली. स्पॅनिश कंपनीबरोबर भागीदारी करणाऱ्या महिंद्र अॅण्ड महिंद्रचा समभाग सेन्सेक्समध्ये सर्वात वरती ४.४३ टक्क्यांनी वाढला. तर दोहास्थित कतार फाऊंडेशनला २० कोटी समभाग देऊ करणाऱ्या भारती एअरटेलचे समभाग मूल्यही २ टक्क्यांनी उंचावले. सेन्सेक्समधील सिंहाचे वाटेकरी, रिलायन्स आणि इन्फोसिस हे प्रत्येकी एक टक्क्याने वाढले. प्रमुख निर्देशांकातील २३ समभागांना मागणी राहिली. भेल, बजाज ऑटो, सन फार्मा, एचडीएफसी हेदेखील तेजीच्या यादीत नोंदले गेले.
बाजाराला आता वेध ‘फेड’च्या सकारात्मकतेचे!
यंदा अपेक्षेप्रमाणे नसली तरी आगामी कालावधीत रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या संकेताचे सूर पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सोमवारी सेन्सेक्सला त्याच्या आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले. तथापि बाजाराला वेध आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक - फेडरल रिझव्र्हच्या मंगळवारच्या नियोजित बैठकीचे लागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-06-2013 at 12:06 IST
TOPICSबिझनेस न्यूजBusiness Newsबीएसई सेन्सेक्सBSE Sensexशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex soars 148 pts despite rbi rate cut woe mahindra and mahindra shares lead