रिझव्‍‌र्ह बँकेने योजलेल्या उपायांना रुपया अनुकूल प्रतिसाद देत असल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील निधीचा ओघ पुन्हा सुरू केला. ऑगस्ट महिन्याच्या वायदापूर्तीच्या गुरुवारी सेन्सेक्स दिवसअखेर ४०४.८९ अंशांनी वाढत १८,४०१.०४ पर्यंत तर निफ्टी १२४.०५ अंशांने वधारत ५,४०९.०५ वर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत कालच्या सत्रात ६९ पर्यंत नवी विक्रमी घसरण नोंदविणारा भारतीय रुपया दिवसअखेर तब्बल २२५ पैशांची उसळी घेत ६६.५५ च्या वरच्या टप्प्यावर झेपावला. त्याची ही आजची झेप गेल्या दीड दशकातील सर्वोच्च ठरली आहे.
बुधवारी ६८.८३ पर्यंत घसरलेला रुपया गुरुवारी व्यवहाराच्या सुरुवातीला सावरलेला दिसला. चलनातील घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने सार्वजनिक तेल व वायू कंपन्यांना स्वतंत्र यंत्रणेद्वारे डॉलर उपलब्ध करून दिल्याचे पडसाद चलन व्यवहारासह भांडवली बाजारावरही दिसून आले. ६६.९०च्या वरच्या स्तरावर खुले झालेले रुपयाचे व्यवहार दिवसभरात ६७.९२ पर्यंत घसरले. व्यवहारादरम्यान ते ६६.५१ पर्यंत उंचावलेदेखील. अखेर समकक्ष, ६६.५५ पातळीवर ते विसावले. टक्केवारीत त्यातील वाढ कालच्या तुलनेत ३.२७ टक्के होती. चलनाने मोठी उडी घेतानाचा गेल्या तीन दिवसांतील सततचे अवमूल्यनही रोखले.
सीरियावरील अमेरिकेचा संभाव्य हल्ल्याची भीती गुरुवारी परकी चलन व्यवहाराप्रमाणेच भांडवली बाजारातून नाहीशी झालेली दिसली. कालच्या सत्रात मोठी आपटी नोंदविल्यानंतर किरकोळ वाढ राखणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारी सुरुवातीच्या सत्रातही सकारात्मक कामगिरी बजावत होता. शेअर बाजारातील व्यवहार बंद होईपर्यंत रुपयाचा प्रवासही डॉलरच्या तुलनेत ६७.३० अशा समाधानकारक पातळीवर सुरू होता. तेव्हा दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीच्या लाटेवरच स्वार राहिले. दिवसअखेर २२ ऑगस्टनंतरच्या वरच्या टप्प्याला पोहोचला सेन्सेक्स आता १८,५०० च्या नजीक तर निफ्टीदेखील ५,५०० च्या वेशीवर येऊन ठेपला आहे. सेन्सेक्समधील नवागत सेसा गोवाचे मूल्य सर्वाधिक  तब्बल १३.५४ टक्क्यांनी उंचावले. त्याचबरोबर एकूण निर्देशांक वधारणेत एचडीएफसी, हिंदाल्को, रिलायन्स यांचीही साथ राहिली. सेन्सेक्समधील २४ कंपनी समभागांना मागणी राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेल कंपन्या तेजाळल्या
आयातीवर मोठय़ा प्रमाणात निर्भर असलेल्या भारतातील तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांना वाढत्या दराने इंधन खरेदी करावी लागते. त्यातच सध्या वधारत्या डॉलरला आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांचीही साथ मिळाली आहे. यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने २००८ प्रमाणे यंदाही या कंपन्यांना विदेशी चलन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. तेल कंपन्यांना सरासरी महिन्याला ७५ लाख टन कच्चे तेल आयात करण्यासाठी ८.५ अब्ज डॉलरची गरज भासते. याची दखल तेल व वायू क्षेत्रातील समभागांच्या मूल्यांनीही दिवसअखेर घेतली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही याच क्षेत्राची २.८६ टक्क्यांसह आगेकूच राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख तीन कंपन्यांची समभाग मूल्य वाढ ४ टक्क्यांपर्यंत राहिली. दिवसअखेर हिंदुस्थान पेट्रोलियमला घसरण सोसावी लागली.