विदेशी गुंतवणूकदारांवरील करविषयक अनिश्चितता भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा घसरणीला कारण ठरली. सलग पाच व्यवहारानंतर बुधवारी निर्देशांकांत भर घालणाऱ्या बाजारात, वरच्या स्तरावर नफेखोरी अवलंबिली गेल्याचे चित्र दिसले.
दिवसात २८ हजाराचा पल्ला गाठल्यानंतर, अखेर १५५.११ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७३५.०२ वर, तर ३१.४० अंश घसरणीसह निफ्टी ८,३९८.३० वर स्थिरावला.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांवरील पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या ४०,००० कोटी रुपयांच्या कराबाबतची अनिश्चितता सरकार व गुंतवणूकदारांच्या बैठकीनंतरही कायम आहे. याचे विपरीत सावट गुरुवारी बाजारात उमटले. यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सूनच्या अंदाजाने रिझव्र्ह बँकेद्वारे व्याजदर कपातीची आशाही मावळल्याचे मानून गुंतवणूकदारांनी व्यवहाराच्या शेवटच्या दीड तासात बाजारावर दबाव निर्माण केला.
सेन्सेक्समध्ये सन फार्मा सर्वाधिक २.५५ टक्क्य़ांसह घसरला, तर स्टेट बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी, महिंद्र अॅण्ड मिहद्र, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज्, लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, विप्रो, रिलायन्स यांनीही घसरणीत वाटा राखला. टाटा स्टील ५ टक्के वाढीसह बंद झाला. तथापि अन्य कंपन्यांच्या समभागातील घसरणीने पोलाद निर्देशांकाला खाली आणले.
भांडवली बाजारही कर अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर
विदेशी गुंतवणूकदारांवरील करविषयक अनिश्चितता भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा घसरणीला कारण ठरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2015 at 12:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex surrenders early gains falls 155 points