रोडावलेला आर्थिक विकासदर ही खरे तर शेअर बाजारासाठी चिंतेची बाब ठरावी, परंतु ती पूर्णपणे दृष्टीआड करीत शुक्रवारी सप्ताहाची अखेर बाजाराने ‘सेन्सेक्स’मध्ये आणखी १६९ अंशांची उत्साही भर घालत बाजाराने केली. अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती पाहून रिझव्र्ह बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपात केली जाईल, असा बाजाराचा होरा असून त्यामुळेच वाईट बातमीवर सेन्सेक्सने वाढ दाखविणारी उलटी प्रतिक्रिया नोंदविली.
शुक्रवारी सकाळी जाहीर झालेले अर्थव्यवस्थेचा कल दर्शविणारे निराशाजनक आकडेही गेल्या काही दिवसापासून बाजाराने धरलेल्या उत्साही वळणावर पाणी फेरू शकले नाहीत. सेन्सेक्सने गुरुवारी १९ हजाराची पातळी ओलांडली. तर आज सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ०.८८ टक्के आणि ०.९४ टक्क्यांची केलेली कमाई ही शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकामध्ये झालेली सलग चौथी वाढ आहे. गेल्या चार सत्रात सेन्सेक्समध्ये ८३३.३३ अंशांची तर निफ्टीमध्ये २५३.२५ अंशांची भर पडली आहे. नोव्हेंबर २०११ च्या शेवटच्या सप्ताहानंतर एका आठवडय़ात निर्देशांकांनी केलेली ही सर्वात मोठी कमाई आहे. निर्देशांकांच्या या कमाईचा चांगलाच फायदा धातू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बँकिंग, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्र, तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या समभागांना झालेला दिसून आला. परिणामी सेन्सेक्सपाठोपाठ राष्ट्रीय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा