अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडून सुरू असणाऱ्या प्रोत्साहनपर रोखे खरेदीला सध्या लाभलेले जीवदान आणि त्यामुळे डॉलरच्या तुलनेत वधारून त्रेसस्ट रुपयाच्या खाली आलेला रुपया याचा परिणाम सेन्सेक्स सोमवारी २०,७०० च्या पुढे जाताना महिन्यातील दिवसाच्या सर्वात मोठय़ा झेपेचा साक्षीदार ठरला.
सोबतच प्रख्यात गुंतवणूक सल्लागार ‘युनियन बँक ऑफ स्वित्र्झलड’कडून भारताची ‘ओव्हरवेट’ वरून ‘होल्ड’ म्हणून केलेली पतकपात तर त्याच वेळी चीनची ‘होल्ड’ वरून ‘ओव्हरवेट’ म्हणून केलेली पाठराखण यामुळे मुंबई निर्देशांकाने पंधरवडय़ाच्या उच्चांकावर स्वार होणे पसंत केले.
सप्ताहारंभी सेन्सेक्सने ४५१.३२ अंश वाढ नोंदवत २१,८५०.७४ पर्यंत गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२.८५ अंशांची भर नोंदवत ६,१८९ वर पोहोचला. सेन्सेक्समधील ३० पकी २६ कंपन्यांचे भाव वधारले.
शुक्रवारी भारतीय शेअर बाजार बंद झाल्यानंतर ‘फेड’च्या नवनियुक्त अध्यक्ष जेनेट येलन यांनी  प्रोत्साहनपर रोखे खरेदी सुरू ठेवण्याला दिलेली निसंदिग्ध ग्वाही व सकाळी बाजार उघडतानाच ‘युनियन बँक ऑफ स्वित्र्झलड’ने प्रसिद्ध केलेल्या उभरत्या अर्थव्यवस्थेच्या अहवालात ‘भारताबाबत आम्ही आशावादी आहोत; परंतु दीर्घकालीन विचार करता व भारतीय बाजारात झालेली निर्देशांकांची वाढ लक्षात घेता आम्ही हे पाऊल उचलत आहोत’ असे नमूद केल्यामुळे सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला होता.
निर्देशांक वधारण्यात एचडीएफसी बँक, लार्सन टूब्रो, आयटीसी, ओएनजीसी व भेल यांचे प्रमुख योगदान होते. मुंबई शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकात माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता सर्व निर्देशांकांनी कमाई केली. मँशरिक या आणखी एका गुंतवणूक सल्लागार संस्थेने भारताबाबत आशावादी चित्र रंगवीत रुपया डॉलरच्या तुलनेत डिसेंबर अखेरीपर्यंत ६०.५०-६१.००० दरम्यान असेल असे वृत्तसंस्थाशी केलेले वक्तव्य बाजारातील खरेदीदारांच्या पथ्यावर पडले.
मुंबई शेअर बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी २,०३७.१२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदली गेली. एकाच दिवसातील मोठय़ा निर्देशांक झेपेने गुंतवणूकदारही एक लाख कोटींनी मालामाल झाले. प्रमुख भांडवली बाजाराची सोमवारची १८ ऑक्टोबरनंतरची एकाच व्यवहारातील सर्वात मोठी झेप ठरली. त्या वेळी सेन्सेक्स एकाच दिवशी ४६७.३८ अंशांनी वधारला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचिबद्ध कंपन्यांना कठोर नियमावली
सूचिबद्ध कंपन्यांमार्फत नियमांचे कठोर पालन केले जाण्याच्या दृष्टिने भांडवली बाजार नियमाकनाने सोमवारी कठोर अशी नियमावली जारी केली. यासाठी शेअर बाजारांनाही अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यासह नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कंपन्यांचे प्रवर्तक, संचालक आदींची अद्ययावत माहिती असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनी त्यांच्या नोंदणी कराराच्या वेळी केलेल्या नियमांचे पालन न करत असल्याबद्दल सेबी अध्यक्ष. यू. के. सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करत अशाप्रकारच्या नियमांचे संकेत दिले होते.