व्यवहारात १५० अंशांच्या घसरणीने रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या पतधोरणाबद्दल निराशा व्यक्त करणारा मुंबई निर्देशांक सत्राअखेर किरकोळ, २४.९४ अंशांचे नुकसान सोसणारा ठरला. व्यवहारात २०,५५४.२८ पर्यंत तळ नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर २०,६८३.५१ वर समाधान मानले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९.६० अंश घसरणीसह ६,१२६.२५ वर विसावला.
रिझव्र्ह बँकेच्या संभाव्य पतधोरणाबद्दल भांडवली बाजाराने गेल्या काही दिवसांत अनोखी प्रतिक्रिया नोंदविली आहे. असे करताना सलग दोन व्यवहारात तेजी नोंदवीत २१,३०० हजारापुढील नवे ऐतिहासिक पाऊलही त्याने टाकले. तर सोमवारच्या व्यवहारात सप्टेंबर २०१३ नंतरची सर्वात मोठी आपटीही त्याने नोंदविली. तत्पूर्वी सलग तीन व्यवहारात तो ६९० अंशांचे नुकसान नोंदविणारा ठरला आहे. मंगळवारी रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्स ५३ अंशाने वधारला होता. मात्र दुपारपूर्वी पाव टक्के दरवाढीचे धोरण जाहीर होताच मुंबई निर्देशांक १५० अंशांनी आपटला. याच वेळी त्याने गेल्या दोन महिन्यांतील नीचांकही नोंदविला. व्यवहारात कसा तरी २०,७९५.३५ पर्यंत गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक, सन फार्मा, इन्फोसिस, सिप्ला, हिंदुस्तान यूनिलिव्हर यांच्या मूल्य घसरणीमुळे खाली खेचला गेला. तर वधारलेल्या १६ समभागांमध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, सेसा स्टरलाइट, हिंदाल्को, बजाज ऑटो, भेल यांचा समावेश राहिला.
रुपया भक्कम!
ल्ल परकी चलन व्यवहारात रुपया मंगळवारी तब्बल ५९ पैशांनी भक्कम बनला. डॉलरच्या तुलनेत ६३ च्या खाली येताना भारतीय चलन ६२.५१ वर स्थिरावले. जवळपास एक टक्क्यांची ही चलनाची झेप होती. गेल्या सलग तीन व्यवहारांत रुपया कमालीचा कमकुवत बनला होता. असे करताना त्याने या तीनही सत्रात १२९ पैशांची घसरण नोंदविली होती. तर सलग दोन व्यवहारात ६२ च्या खाली व तिसऱ्या दिवशी तो ६३ च्याही खाली गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा