केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडत असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा उल्लेख केला. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड ट्रेनचा पाठपुरावा केला जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. १५० नव्या हायस्पीड ट्रेन सुरू करणार असल्याची घोषणा करून अर्थमंत्री सीतारामन यांनी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला. या नव्या रेल्वे कुठे आणि कधी सुरू होणार हे मात्र त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले नाही.

निर्मला सीतारामन यांनी यावेळी तेजस एक्स्प्रेसरख्या ट्रेन्स पर्यटन स्थळांशी जोडणार असल्याची माहिती दिली. तसंच २०२३ पर्यंत मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे सुरू करणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केले. देशात नवे १०० एअरपोर्ट उभारण्यात येणार आहे.

उड्डान योजनेअंतर्गत नवीन १०० विमानतळं सुरू करणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. सध्या देशात या योजनेअंतर्गत अनेक विमानतळे सुरू करण्यात आली आहेत. पण त्यांना फारसा प्रतिसाद दिसत नाही. पण, काही भागातील प्रवाशांना या योजनेमुळे प्रवासासाठी नवा पर्यांय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आणखी १०० विमानतळे सुरू करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा – Budget 2020: पीपीपी तत्वावर देशात पाच नव्या स्मार्ट सिटी उभारणार

२००० किमीचा कोस्टल रोड बनवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या शिवाय़ २७ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी स्पष्ट केले. हायवेचे होणार व्यवसायिकरण, त्यातून पैसा मिळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader